मानवत येथे मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचा महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
मानवत येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने १७ जून मंगळवार रोजी दुपारी १२:०० वाजता मानवत शहरातील तापडिया लॉजचा सभागृहात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान बैठकीत विविध विषयावर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे या मध्ये शेतकऱ्यांची खते बियानासाठी होणारी आर्थिक लूट थांबवावी व तालुक्यातील घरकुल योजनासाठी मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी व शेतकऱ्यांना कर्ज माफी व पीक विमा व पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे व तालुक्यातील गायरान धारक शेतकऱ्याच्या विविध समस्या व गेली काही दिवसापासून निराधार, श्रावणबाळ वयोवृध लाभार्थ्यांचे थकीत असलेले अनुदान तात्काळ वाटप करावे आदी विषयी चर्चा करुन या बाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. तरी या महत्वपूर्ण बैठकीस तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अॅड. दिगांबर घुगे, वंचित बहुजन आघाडीचे युवक तालुकाध्यक्ष शरद कांबळे, महिला तालुकाध्यक्ष श्रीमती. मंदाकिनीताई राठोड यांच्या अमोल सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
