ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रविशेषसामाजिक

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबास महिलांच्या वतीने आर्थिक मदत

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक 18 जानेवारी) परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना एका समाजकंटकाने १० डिसेंबर २०२४ रोजी केली. या प्रकरणी मोठा हिंसांचार उसळला व दरम्यान पोलीस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला होता.

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास आर्थिक मदत परभणी येथील महिलांच्या वतीने १७ जानेवारी शुक्रवार रोजी करण्यात आली श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून वंचित बहुजन आघाडीचा महिला जिल्हाध्यक्षा सुनिताताई साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथील जनप्रीय कॉलनी, रामदास नगर, सहारा कॉलनी, रचना नगर येथील महिलांनी शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांना १७ हजार रुपयेची आर्थिक मदत दिली.

यावेळी आर्थिक मदत सुपूर्द करताना वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रशिक्षक सुरेश शेळके, वंचित बहुजन आघाडीचा महिला जिल्हाध्यक्षा सुनिताताई साळवे, महिला जिल्हा सचिव सविता ताई सोनटक्के, वंचित बहुजन आघाडीचे युवा (उत्तर) जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ गाढे, संदीप खाडे, यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होत्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!