महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शेकापूर/केरोळी मध्ये जल जीवन पाण्याची टाकी गायब तर, सी.सी.रोड चे बोगस पद्धतीचे कामे करून ठेकेदार झाला भुर्र

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✍️समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)

माहूर (दि. २० डिसेंबर) तालुक्यातील मौजे शेकापूर/ केरोळी या गावात ग्रामपंचायत मध्ये अनेक कामे झाली असून, पूर्ण कामे बोगस पद्धतीची झाली आहे, करोली येथे जल जीवन मिशन 50 लाख रुपयाची पाण्याची टाकी मिस्टर इंडिया म्हणजेच गायब झाली आहे.

कारण लोकांच्या घरापर्यंत फक्त पाईपलाईन करून सोडून दिले आहे आणि सी सी रोड हे अत्यंत बोगस पद्धतीचे करून संबंधित ठेकेदाराणे पळ काढला आहे ग्रामपंचायत इंजिनियर किंवा पंचायत समिती या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे.

शेकापूर येथे सुद्धा दलित वस्ती मध्ये सीसी रोड चे काम झाले असून तिथे सुद्धा अत्यंत बोगस पद्धतीचे काम व साईडची नाली गायब आहे.

या गावातील नागरिकांनी कामाचा विरोध करून सुद्धा काम बोगस पद्धतीचे केले आहे, संबंधित इंजिनीयरला याची माहिती दिली असता, त्यांनी कसलीही दखल न घेता काम पूर्ण करून घेतले, गावकऱ्यांची मागणी आहे की, सर्व कामांची चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

ग्रामपंचायत ने कामे न करता परस्पर बिले उचलून लाखो रुपयाचा अपहार केला आहे. मनून गावाला कुणी वाली आहे का नाही आम्हाला कोणी न्याय देणार की नाही असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!