उमरखेडमहाराष्ट्रराजकिय

सत्यशोधक शेतकरी संघाचे उमेदवार विजय खडसे यांच्या प्रचाराचा नारळ अमृतेश्वर संस्थान हरदडा येथे संपन्न

✒️ बबलू भालेराव मुख्य संपादक मो.9922870518

✒️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक ७ नोव्हेंबर) कालच पत्रकार परिषदेत सत्यशोधक शेतकरी संघाच्या वतीने घोषित केलेल्या विजय खडसे यांच्या प्रचाराचा नारळ आज अमृतेश्वर संस्थान हरदळा येथील सत्यशोधक शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजून ३२ मिनटाला पार पडला.

Oplus_131072

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम पाटील नलवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर ,सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी, डॉ. विः ना . कदम, भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, उमाकांत मडके, देवानंद मोरे, प्रज्ञानंद खडसे,कृष्णा पाटील देवसरकर, यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.

यावेळी विविध मान्यवरांचे मनोगत व्यक्त केले विजयराव खडसे यांनी आपल्या मनोगतातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे दोन वेळा पडलेल्या सर्वच माजी आमदारांना परत तिकीट दिले परंतु उमरखेड महागाव मतदार संघात मी प्रबळ दावेदार असताना सुद्धा भरमसाठ पैसा पाई उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला उमेदवारी दिली नाही.

मी मागासवर्गीय असल्यामुळे माझ्यावर हा अन्याय केला गेला मला उमेदवारी दिली नसली तरी स्थानिक च्या कोणत्याही इच्छुक काँग्रेस उमेदवाराला तिकीट दिले असते तरी आणि दिलेल्या उमेदवाराला तिकीट देत असताना मला विश्वासात घेतले असते तरी कदाचित मी अपक्ष उमेदवारी भरली नसती सामाजिक संघटनेसह सत्यशोधक शेतकरी संघाने मला पाठिंबा दिल्यामुळे आमची बाजू भक्कम झाली आहे येणाऱ्या काळात ऑटो या निशाणी समोरील बटन दाबून मला विजय करा असे आवाहनही ते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले

यावेळी बालाजी वानखेडे, उद्धव गायकवाड, प्रज्ञानंद खडसे, डॉ. वि . ना . कदम, प्रकाश पाटील देवसरकर, नितिन माहेश्वरी यांनी मनोगत व्यक्त केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!