दोन तरुणांच्या आत्महत्येने गावावर शोककळा,
रुपाळा (नागापूर) येथे 12 तासांत दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
उमरखेड – शहरालगत असलेल्या नागापूर (रुपाळा) या एकाच गावात अवघ्या 12 तासांच्या अंतराने दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

पहिली घटना 21 वर्षीय सावन जाधव यांनी दि. 18 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली तर या प्रकरणी बाळु बिबीषण राठोड (वय 45 वर्षे, रा. नागापूर रुपाळा) यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावातील सेवालाल महाराजाच्या ओट्यावर बसले असताना त्यांची बहीण सिमाबाई यांनी आरडाओरड केली. त्यामुळे ते तात्काळ तिच्या घरी गेले. घराचा दरवाजा तोडून आत पाहिले
असता, सावन जाधव याने टिनपत्राखालील लोखंडी चॅनलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

सदर घटनेची उमरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर दुसरी घटना 12 तासाच्या फरकाने दि 19 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास 20 वर्षीय तरुण पवन नामदेव इंगळे रा. नागापूर (रुपाळा) यांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
असता, सावन जाधव याने टिनपत्रा खालील लोखंडी चॅनलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. सदर घटनेची उमरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना
यानंतर अवघ्या 12 तासांनी, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 7 वाजताच्या दरम्यान, याच गावातील आणखी एक तरुण पवन नामदेव इंगळे (वय 20 वर्षे, रा. नागापूर रुपाळा) याने शेतात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. नागापूर रुपाळा शिवारातील पवन बंग यांच्या शेतामधून जाणाऱ्या बंद कॅनॉलच्या बाजूला असलेल्या

बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन पवन इंगळे याने जीवन संपवले. त्या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी मृतकाच्या वडिलांना माहिती दिली. यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच उमरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला डॉक्टरांनी तपासणीनंतर पवन इंगळे यांना मृत घोषित केले.
मृतकाच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जयकुमार राठोड पुढील तपास करीत आहेत.


