www.google.comअपराधअवैधआरोग्यउमरखेडउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरसामाजिक

उमरखेड शहरात गुटख्याचा काळा बाजार जोरात; शेकडो युवक व्यसनाच्या आहारी

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 10 मार्च) – शहरातील युवकांना व्यसनाच्या आहारी लावून उमरखेड शहरात गुटख्याचे मनमानी भाव वाढवून मोठया प्रमाणात काळा बाजार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. आंद्रप्रदेशातून हिमायत नगर मार्गे उमरखेड शहरात छुप्या पद्धतीने मोठया प्रमाणात गुटख्याची आवक सुरु आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये हळूहळू सुरू झाली आहे.

शहरात हा माल वितरित करण्यासाठी 20 जणांची टोळी कार्यरत असल्याचे समजते. हे लोकं दुचाकी वाहनावरून राजरोस पणे गुटखा वितरित करीत आहेत. यांना पोलिसांची अजिबात भीती उरली नाही! या कामी काही पोलीस गुटखा बहाद्दरांना मदत करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जाते.

उमरखेड शहरात शिक्षण घेण्याकरिता ग्रामीण भागातून शाळकरी मुलं येतात, ते गुटख्याच्या आहारी जाऊन आपले जीवन बरबाद करून घेत आहेत. याला जबाबदार कोण?शाळा -महाविद्यालय परिसरात अगदी सहज गुटखा उपलब्ध होत असल्याचे कळते आहे. मुलांना व्यसनी लावून आता जादा दराने गुटखा विक्री करून आपले इस्पित गुटखावाले साध्य करीत आहेत.

या प्रकारावर वेळीच अंकुश न केल्यास परिस्तिथी चिंताजनक होऊ शकते. प्रशासनाने यावर लक्ष देऊन संबंधित गुटका बहादरांना मुस्कट्या आवळन कडक दंडात्मक कारवाई करावी..! अशी मागणी जोर देत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!