वादग्रस्त मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांची अखेर बदली

{महिला बचत गटाच्या तक्रारीची मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घेतली दखल}
✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✍🏻 संदेश कांबळे (पोफाळी/मुळावा विशेष प्रतिनिधी) मो.95031 51634
मुळावा-: (दिनांक 5 जानेवारी) पिंपळदरी येथील महिलांनी बचत गटांना शेळी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत माधुरी दळवी यांची यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

बचत गट शेळी प्रकरण तालुक्यात चांगलेच गाजले होते,याची दखल घेत अखेर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी माधुरी दळवी यांची बदली केली आहे.

पिंपळदरी येथील आदर्श व नरेंद्र बचत गटांच्या महिलांना 90% अनुदानावर 220 शेळ्या मंजूर झाल्या होत्या व यासाठी लागणारा 17 लाख रुपयांचा निधी बचत गटांच्या खात्यात जमा झाला होता.
हा निधी सत्कर्म कंपनीच्या खात्यामध्ये वर्ग करून सत्कर्म कंपनी मार्फत जबरदस्ती शेळ्या खरेदीसाठी दबाव टाकून या शेळी प्रकरणात माधुरी दळवी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत या दोन्ही बचत गटांच्या महिलांनी तक्रार दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली होती,

सदर प्रकरणाची चौकशी अद्याप गुलदस्त्यात असून पण या प्रकरणात ज्यांच्यावर महिलांनी आरोप करून तक्रार दाखल केली होती त्या मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांची अखेर बदली करण्यात आली आहे.

चौकट -: “बदली रद्द करण्यासाठी अनेक राजकिय नेत्यांच्या भेटी”
यवतमाळ जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष सीईओ मंदार पत्की यांनी वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या माधुरी दळवी यांची बदली केली आहे.

पण झालेली बदली रद्द करण्यासाठी माधुरी दळवी यांनी आमदार, खासदार व इतर काही राजकिय नेत्यांच्या भेटी घेऊन बदली रद्द करण्यासाठी शिफारस पत्राची मागणी केल्याची खात्रीपूर्वक माहिती महाराष्ट्र वायरल न्यूज ला मिळाली आहे.

त्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष सीईओ राजकिय दबावाखाली येऊन बदली रद्द करतात का…? की दळवी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.
