Uncategorized

अपक्ष उमेदवार विजयराव खडसे यांचे मतदार बंधू-भगिनींना नम्र आवाहन ऑटो रिक्षा निशाणीवर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा..!

✒️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक) मो.9823995466

✒️ बबलू भालेराव मुख्य संपादक मो.9922870518

उमरखेड (दिनांक 8 नोव्हेंबर) उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या प्राणप्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी विजय खडसे आपणास नम्र आवाहन करतो की, मी आपल्या सहवासात गेली 40 वर्ष सुखदुःखाचा सहकारी म्हणून जगतोय, आपल्याशी निष्ठा राखून, आपल्या सर्वांचा सहकारी म्हणून, खाल्ल्या मिठाला जागणारा निष्ठेने वागणारा साऱ्या जातीधर्माच्या, पंथाच्या लोकात आपलेपण, जपणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत, आपल्या प्रेमाच्या, स्नेहाच्या, आपुलकीच्या, सहकार्याच्या भरवशावर एका मुजोर, भ्रष्ट, धनदांडग्या, बाहेरच्या, उपऱ्या, पार्सल पॉकेट, अनैतिक विचाराच्या माणसाविरुद्ध आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर, आपल्या अस्तित्वाची अस्मितेची स्वाभिमानाची म्हणजेच भूमिपुत्राची लढाई लढण्यास मी सज्ज आहे. माझा अभिमन्यू करण्यासाठी काही लाचार विकाऊ लोकांची मोठी फौज पैशाच्या बळावर मला घेरण्याचं काम करत आहे.

आपल्यातीलच काही विकल्या गेलेल्या बांडगुळांनी ही योजना करून माझे विरुद्ध मोठे षडयंत्र, जहरी अपप्रचार, आणि भूमिपुत्राच्या निष्ठेला आव्हान निर्माण केले आहे, मात्र त्यांचे हे षडयंत्र आपण ओळखून आहात. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, नीती भ्रष्ट विरुद्ध सामान्य, बाहेरचा उपरा, पार्सल विरुद्ध स्वाभिमानी भूमिपुत्र, लाचारविरुद्ध स्वाभिमानी अशी ही आपली सर्वांची लढाई लढण्यास मी इमाने इतवारे तयार आहे, या स्वाभिमानाच्या लढाईत आपण सर्व ताकदीनिशी उतरून आपल्या स्वाभिमानी आणि लढाऊ बाण्याचे सैनिक म्हणून, या अनैतिक आणि भ्रष्ट प्रवृत्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आपण भूमिपुत्र म्हणून या लढाईत माझ्यासोबत राहावं ही कळकळीची विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा टाकलेलो आहे.

आपण पूर्ण अंशाने माझ्यासोबत राहाल अशी अपेक्षा आणि खात्री आहे. आपल्या स्वाभिमानाच्या, अस्मितेच्या, अस्तित्वाच्या, आणि भूमिपुत्राच्या लढाईत सहभागी होऊन, ऑटो रिक्षा या विजयी चिन्ह समोरील बटन दाबून या लढ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे ही नम्र आणि कळकळीची विनंती…! अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार विजयराव खडसे यांनी केली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!