ताज्या बातम्यामहाराष्ट्रसन्मान सत्कारसामाजिक

७ वी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

[दिनांक ९ मार्च शिवपुरी चिकाळा परिसर]

✍🏻बबलु भालेराव मुख्य संपादक ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

हदगाव:- गेल्या सात वर्षापासून तालुक्यातील चिकाळा शिवपुरी येथे सामाजिक – कार्यकर्ते बोधी वृक्ष कदम हे रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करीत असतात अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी धम्माच्या – चळवळीला गती देण्याचे काम – केले अवघ्या सात वर्षांमध्ये रमाई बौद्ध धम्म परिषद नावा रुपाला आणल्यामुळे जिल्ह्यासह आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमधून न अनुयायी या धम्म परिषदेला हजेरी लावतात.

यावर्षी ९ मार्च रविवार रोजी होणाऱ्या रमाई वबौद्ध धम्म परिषदेची सुरुवात सकाळी आठ वाजता पंचशील ध्वजारोहण श्रीमती आशाताई औटे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर भदंत दीप रत्न व मदत धम्मानंद यांची धम्मदेशना दुपारी चार वाजता दुसऱ्या सत्रामध्ये तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा सत्कार आयोजक बोधिवृक्ष कदम व संबोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या मार्फत होणार आहे.

सायंकाळी ७ वाजता व्याख्यानमाला यामध्ये प्रमुख व्याख्याते प्रा. नितेश कल्हाळे व जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक प्रा. जगदीश ओव्हळ यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय त्यागमूर्ती माता रमाई गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे.

यामध्ये रंजेनाबाई ग्यानोबा लोणे रा. दिग्रस यांनी गीत गायनाच्यामाध्यमातून धम्माची चळवळ जीवंत ठेवली गेल्या ३० वर्षांपासून समाजकार्यात मौलाचे काम करून समाजामध्ये आदर्श निर्माण केला त्याबद्दल त्यांना त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

त्याच बरोबर रेणुकाबाई मवाडे रमाबाई चंदनशिवे शाहीर नारायण यांनी सुद्धा चळवळीत योगदान दिल्या बदल त्यांना सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर दोन पुरस्कार हे मरणउत्तर देण्यात येणार आहे. यामध्ये आयुष्यभर समाजाचे कार्य करणारे कै. ग्यानोबाराव वाठोरे, व कै. शांताबाई पांडुरंग मनवर यांच्या नातेवाईकाला देण्यात येणार आहे.

तिसरे सत्र सुरू होईल रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सविधान मनोहरे सच अमरावती व अंजली घोडके यांचा बुद्ध भीम गीताच्या कार्यक्रमाची मैफिल रंगणार या कार्यक्रमाचे उद्घाटक हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ सोनुले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन अनिताताई हिंगोले नांदेड जिल्हा परिषद माजी सभापती. स्वागत अध्यक्ष प्रा. डॉ. मोहनराव मोरे. मुख्य अतिथी पँथर आशिष भैया विजय वाकोडे विशेष उपस्थिती प्रशांत इंगोले प्रभू सावंत अँड. डी एफ हरदडकर. माधव दादा जमदाडे, विजयराव खडसे, शशिकांत भाऊ वाघमारे, दादासाहेब शेळके, सुधीर भाऊ साळवे अशोक कांबळे, डॉ. रेखाताई चव्हाण,अभय वाठोरे विशाल नरवाडे, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर (शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी), रवी हडसे, जयश्री नरवाडे, सुभाष घुंगरराव इत्यादी उपस्थित राहणार आहेत.

तरी या रमाई बौद्ध धम्म परिषदेला सर्वांनी उपस्थित रहावे. असे आव्हान मुख्य आयोजक बोधिवृक्ष कदम यांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!