क्रीडाखेळमहाराष्ट्रशहर

आश्टे डू आखाडा स्पर्धेमधून काश्यपीची झाली विभाग स्तरावर नियुक्ती

यवतमाळ क्रीडा क्षेत्र

✒️बबलु भालेराव मुख्य संपादक मो.9922870518

✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सहसंपादक मो.9823995466

यवतमाळ (दिनांक 2 डिसेंबर) क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आश्टे डू आखाडा स्पर्धा 204-25 , दिनांक 27-11-24 रोजी नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे संपन्न झाल्या.

या स्पर्धेत सनराईज इंग्लिश मिडीयमस्कुल येथिल शाळेची विद्यार्थीनी काश्यपी विनोद दोंदल हिने शिवकला या खेळ प्रकारात वयोगट 14 मद्ये प्रथम क्रमांक, तसेच हस्तकला व मर्दानी कलेत तृतीय क्रमांक मिळवला व तिची विभाग स्तरावर नियुक्ती झाली.

तिच्या यशाचे श्रेय ती आई कीर्ती दोंदल वडिल विनोद दोंदल मुख्य प्रशिक्षक प्रितम सोनवणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक संचालक दिनेश पवार सर, शारीरिक शिक्षक मनोज झाडे सर, उपमुख्याध्यापक स्मिती देशमुख, निधी तिवारी (देशमुख), शांतनु देशमुख तसेच व तिलकसर आणि ऋषिकेश सरांना व प्रशिक्षण वर्गातील सवंगड्यांना देते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!