अपघातउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यानिधन वार्तायवतमाळ

बैलगाडीने दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

✍️करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)

बिटरगाव – काल दि. 14/02/2026 रोजी माधव मारोती बडेवार रा बिटरगाव ता उमरखेड हा आपले भावाचे लग्नपत्रिका वाटप करत असताना ढाणकी ते खरूस
रस्त्याने आपले मोटरसायकलने जात असताना आपल्या बैलगाडीने जोराची धडक देऊन, अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पसार झालेल्या साहेबराव नामदेव गलेवाड रा खरूस ता उमरखेड या बैलगाडी चालकाचा पोलिसांनी शोध घेतला असून त्याला गुन्ह्यात अटक केली आहे.

आरोपी ने त्याचे ताब्यातील बैलगाडी अंधारात कोणतीही काळजी नं घेता निष्काळजी पणे रोडचे मधोमध चालवून मोसा चालक नामे माधव मारोती बडेवार रा बिटरगाव ता उमरखेड याचे मोटार सायकल ला जबर धडक देऊन त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरला आहे.

नेमकी घटना काय?
काल दि 14/02/2026 रोजी माधव मारोती बडेवार रा बिटरगाव ता उमरखेड हे आपल्या मोटरसायकलवरून भावाचे लग्नाची पत्रिका वाटप करून घरी जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या एका बैलगाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले, तर त्यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर मदत करण्याऐवजी बैलगाडी चालक आपली गाडी घेऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता.
पोलिसांचा तपास आणि अटक
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खालीलप्रमाणे कारवाई केली: • सीसीटीव्ही फुटेज: परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली.

  • खबऱ्यांचे जाळे: स्थानिक खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढला.

कायदेशीर कारवाई पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची बैलगाडी जप्त करण्यात आली आहे. “रस्त्यावर वाहन चालवताना बेजबाबदारपणा दाखवून अपघात करणे आणि जखमीला सोडून पळून जाणे हा गंभीर गुन्हा आहे,” असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे सदरची कार्यवाही ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस हवालदार रोशन सरनाईक, पोका प्रवीण जाधव, पोका राजू बेलेवार यांनी केली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!