उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरशैक्षणिकसन्मान सत्कारसंपादकीयसामाजिक

पत्रकार सिद्धार्थ दिवेकर – अधिकृत परिचय


✍️बबलू भालेराव मुख्य संपादक

यवतमाळ/उमरखेड – नमो बुद्धाय…! जय भीम…! पत्रकार
सिद्धार्थ दिवेकर हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील एक युवा, अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार, समाजसेवक आणि संघटक आहेत. पत्रकारितेसोबतच सामाजिक, शैक्षणिक व बौद्ध धम्माच्या कार्यात ते सक्रिय सहभाग घेत आहेत.


स्थानिक प्रश्नांना न्याय मिळवून देणे, सामाजिक अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे, जनजागृती करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख ध्येय आहे. गरज पडल्यास ते मोर्चे, आंदोलने आणि लोकहिताच्या विविध चळवळींमध्ये अग्रस्थानी राहून नेतृत्व करतात.


सामाजिक व संघटनात्मक जबाबदाऱ्या
पत्रकार – उमरखेड, जि. यवतमाळ
शहराध्यक्ष – भीम टायगर सेना
अध्यक्ष – सम्यक बुद्ध विहार समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड, उमरखेड
सदस्य – शाळा व्यवस्थापन समिती, शहीद भगतसिंग शाळा क्र. २, उमरखेड
सचिव – स्थानिक प्रेस क्लब पत्रकार संघ
अध्यक्ष – बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती
कार्याचा ध्यास
सिद्धार्थ दिवेकर यांनी पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून स्वीकारली आहे. सामाजिक न्याय, शिक्षण, बौद्ध धम्म, संविधानिक मूल्ये, वंचित समाजाचे प्रश्न आणि लोकहिताची कामे यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.


त्यांच्या कार्यामागील प्रेरणा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता, न्याय आणि बंधुतेचे विचार. समाजहित, पारदर्शकता आणि जनसेवा हीच त्यांच्या कार्याची ओळख आहे.
“पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजसेवा हेच माझे ध्येय आहे.” — पत्रकार सिद्धार्थ दिवेकर

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button