ताज्या बातम्यामानवत

मानवत तालुका वकील संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

(वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अनिरुद्ध पांडे; तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. वसीम चौधरी यांची निवड)

[निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन]

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०६ जानेवारी)मानवत तालुका वकील संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

०६ जानेवारी रोजी मानवत वकिल संघाच्या नूतन कार्यकारिणी संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी बैठकीच्या अध्यक्ष स्थानी वकील संघाचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. दिनेश दशरथे यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली.

बैठकीत मानवत तालुका वकील संघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. मानवत तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी म्हणून श्री.ॲड. अनिरुद्ध पांडे यांची तर उपाध्यक्षपदी श्री. अ‍ॅड. वसीम चौधरी निवड करण्यात आली तर उर्वरित कार्यकारिणी ही पुढील प्रमाणे निवडण्यात सचिवपदी श्री. अ‍ॅड. कांचन राठोड, कोषाध्यपदी पदी अ‍ॅड. सतिश चव्हाण, सहसचिव म्हणून अ‍ॅड. हरीदास जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी बैठकीस अ‍ॅड. मुकुंद पाटील, अ‍ॅड. ओ. डी. मगर, अ‍ॅड. दिनेश दशरथे, अ‍ॅड. बळीराम शिंदे, अ‍ॅड. व्ही. आर चौधरी, अ‍ॅड. आर. के. आळणे, अ‍ॅड. कांचन राठोड, अ‍ॅड. सुनील जाधव, अ‍ॅड. यशपाल पंडित, अ‍ॅड. श्याम कुऱ्हाडे, अ‍ॅड. मिलिंद तुपसमुंद्रे, अ‍ॅड. गजानन शिंदे, अ‍ॅड. मुरलीधर मंत्री, अ‍ॅड. किरण बारहाते, अ‍ॅड. राजेंद्र केरे, अ‍ॅड. एस. यु. बारहाते, अ‍ॅड. के. पी. मुडपे, अ‍ॅड. एम. आर. बारहाते, अ‍ॅड. एल. व्ही. कुलकर्णी, अ‍ॅड. डी. डी. मगर, अ‍ॅड. आर. एन. पाटील यांची उपस्थिती होती.

निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!