गायनाच्या माध्यमातून आगळा वेगळा प्रचार देवानंद पाईकराव यांची प्रचारात जोरदार मुसंडी

उमरखेड : महागाव,मतदार संघाती ल एक मे उमेदवार असा आहे. की त्यांनी मोटरसायकलवर प्रचार केला आहे. गावातील लोकांनी लोक वर्गणी करून एक वेगळा विक्रम केला आहे. निवडणूक म्हटलं की आलिशान गाड्या प्रचंड फौज फाटा उमेदवारांकडून पैशांची उधळन पाहायला मिळत आहे.

मात्र उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आझाद समाज पक्षाचे उमेदवार देवानंद पाईकराव यांनी सर्व गोष्टींना छेद देत दुचाकीने आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसहित गावा गावात जाऊन आपल्या गायनाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचार करीत मतदारांची मने जिंकत प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे,

उमरखेड महागाव मतदार संघात यावेळेस बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. एकूण उमेदवार१७ निवडणुकी च्यारिंगणात उभे आहेत.महाविकास आघाडीआणि महायुतीयांच्या सह दोन माजी आमदार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने रंगतदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यातच आझाद समाज पक्षाने सुद्धा मिशनरी गायक सुप्रसिद्ध प्रबोधनकार देवानंद पाईकराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांचा चाहता या मतदारसंघात वाढला आहे.पक्षाचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासहित 50दुचाकीने गावागावात जाऊन प्रचारा धुरळा उडवला आहे.

या आगळ्यावेगळ्या प्रचाराने मतदारांना भुरळ घातल्याचे दिसत असल्याने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मत विभाजन होणार आहे.त्यामुळे बहुरंगी ठरत असलेल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.