उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

“संविधानाची” विटंबना करणाऱ्या राम देवसरकर यांच्यावर “ॲट्रॉसिटी” दाखल करा! अन्यथा आमरण उपोषणाला बसणार भीम टायगर सेनेचा इशारा

✍🏻 (सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक १३ मे) गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाने दि.२९ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयामध्ये “सन्मान चौथ्या स्तंभाचा” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


यावेळी पत्रकार यांचा सन्मान म्हणून गो.सी गावंडे महाविद्यालयाने सर्व पत्रकार बंधू यांना भारतीय संविधान प्रत देऊन गौरविण्यात आले होते.


पण सदर भारतीय संविधान प्रत मध्ये संविधानाच्या उद्देशिकेच्या अगोदर गो.सी गावंडे महाविद्यालयाच्या संस्था अध्यक्ष राम देवसरकर संस्था आणि सचिव डॉ यादवराव राऊत यांचे फोटो टाकणे, संविधानामध्ये छेडछाड करणे हा संविधानाचा अपमान आहे.
ही बाब आमच्या लक्षात आल्याने भीम टायगर सेना संघटनेमार्फत दिनांक ४ मे २०२५ रोजी लेखी स्वरूपात तक्रार उमरखेड पोलीस येथे दिली होती.

नंतर कळाले की, या प्रकरणी दोन व्यक्तीवर गुन्हा नोंद झाला. पण दुर्दैवाने संस्था अध्यक्ष आणि संस्था सचिव यांच्यावर अध्यापही गुन्हा नोंद झाला नाही.
पोलीस प्रशासन व फिर्यादी यांनी या आरोपीला अभय दिले असून यामुळे संस्था अध्यक्ष आणि संस्था सचिव यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.तरी संबंधित व्यक्तींवर भारतीय संविधानाचा अपमान, विटंबना केल्यामुळे यांचेही नावे सदर गुन्ह्यात समाविष्ट करून चारही आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार दाखल करण्यात यावी.


चौकट:- सदर प्रकरणात मुख्य आरोपी राम देवसरकर असतांना सुद्धा सदर प्रकरण गंभीर असून देशाच्या भारतीय संविधानाशी संबंधित आहे. केविलवाणी वाचविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.असा आरोप दादासाहेब शेळके यांनी केला आहे.
सदर आरोपीवर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. – अशी प्रतिक्रिया दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) दादासाहेब शेळके यांनी दिली आहे.


अन्यथा दिनांक २१ मे २०२५ रोजी भीम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहे.यात काही जीवित हानी झाल्यास संबंधित पोलीस प्रशासन जबाबदार राहील..! असा इशारा शाम धुळे यांनी लेखी तक्रार मध्ये दिला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!