आर्थिकताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

बिटरगाव पोलिसांची मोठी कामगिरी : तब्बल 55 लाखांचे सोने जप्त करून बँकेकडे सुपूर्द

✍🏻 करण भरणे सर (बिटरगाव/ढाणकी विशेष प्रतिनिधी)

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या दक्ष पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणामुळे तब्बल 541 ग्रॅम सोने, किंमत सुमारे 55 लाख रुपये, गुन्ह्यातून जप्त करण्यात यश आले. न्यायालयाच्या आदेशानुसार हे जप्तीतील सोने आज दिनांक 20 सप्टेंबर सप्टेंबर 2025 रोजी बुलढाणा अर्बन बँकेकडे विधिवत सुपूर्द करण्यात आले.बुलढाणा अर्बन बँकेशी संबंधित या बहुचर्चित प्रकरणाचा तपास बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने केला. गुन्ह्याचा छडा लावत अल्पावधीत सोनं परत मिळवल्याने बँकेला मोठा दिलासा मिळाला असून या कृतीमुळे पोलिसांबद्दल जनतेत विश्वास आणि सुरक्षिततेची भावना आणखी दृढ झाली आहे.

या यशस्वी कारवाईमध्ये ठाणेदार पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, बीट जमदार रवी गीते व तसेच पोलीस नाईक मोहन चाटे, पोलीस शिपाई प्रवीण जाधव आणि रावसाहेब मस्के यांचा थेट सहभाग होता. या सर्वांच्या समन्वयाने आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले.

संपूर्ण घटनेबाबत बँकेचे स्थानिक अधिकारी यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करत सांगितले – “बिटरगाव पोलिसांनी अल्पावधीत इतकी मोठी कारवाई करून जप्त केलेले सोने सुरक्षितपणे बँकेपर्यंत परत दिले. ही कामगिरी आमच्यासाठी मोठा दिलासा देणारी आहे.

पोलिसांच्या या प्रयत्नामुळे बँक तसेच ग्राहक यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्ही बिटरगाव पोलीस स्टेशनचे आणि यवतमाळ जिल्हा पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानतो.”यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही कारवाई केवळ पोलिस दलासाठीच नाही तर संपूर्ण उमरखेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.गुन्ह्यातील तपासाची ही पद्धत इतर पोलीस ठाण्यांसाठी अनुकरणीय ठरेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांमध्येही पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यात अशाच काटेकोर कारवाईची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!