उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

त्याग, संघर्ष आणि मायेची सावली! माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनी बंधू-भगिनींनी वाहिली श्रद्धांजली!

यावेळी भंते कीर्ती बोधी यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्वांनीच त्या मूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी भंते कीर्ती बोधी, हिराबाई दिवेकर, उषाताई इंगोले अध्यक्षा रमामाता महिला मंडळ, यशोधरा धबाले, ज्योतीताई इंगोले, सुभद्राबाई पाईकराव, शांताबाई दिवेकर, कांचन दिवेकर, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर अध्यक्ष सम्यक बुद्ध विहार समिती यांच्या सह अनेक व बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!