ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

बुद्ध नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

[जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी विशाल (भैय्या) धापसे तर; उपाध्यक्षपदी चक्रपाणी भक्ते; कोषाध्यपदी विजय खरात यांची निवड]

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक २२फेब्रुवारी ) येथील बुद्ध नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी संद र्भात महत्वाची बैठक २० फेब्रु वारी रोजी किशोर भदर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली.

दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी मानवत येथील बुद्ध नगर येथे १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी विशाल (भैय्या ) धापसे तर उपाध्यक्षपदी चक्रपानी भक्ते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उर्वरित कार्य कारिणी ही पुढीलप्रमाणे निवडण्यात आली.

यात कोषाध्यक्षपदी, विजय खरात, सहकोषाध्यक्षपदी, योगेश गायकवाड, सचिवपदी महिपाल भाले, सहसचिव पदी कांचन गायकवाड, कार्याध्यक्षपदी जनार्धन कीर्तने तर सल्लगारपदी विनोद रणदिवे, अनिरुद्ध भाले, उत्तम भदर्गे,

हेमंत घुगे, सुनील धबडगे, सुनील कीर्तने यांच्या सर्वानुमते व राजू भदर्गे, पंकज धबडगे, अभिजीत भदर्गे, विशाल धापसे, महामोघलायन भदर्गे, उत्तमराव घनघाव, विजय खरात यांच्या सूचनेनुसार निवडी करण्यात आल्या.

जयंती उत्सव समितीवर निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बैठकीस मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!