ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

दारव्ह येथे डॉ. वसी सर यांच्या “डॉ. इकराम फार्मा”चा भव्य शुभारंभ

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

दारव्ह- येथे वसी सर यांच्या “डॉ. इकराम फार्मा” या नव्या व्यवसायाच्या शुभारंभानिमित्त त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात दर्जेदार, विश्वासार्ह व परवडणाऱ्या औषध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्यामुळे परिसरातील रुग्ण व नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बिहार हाफीस कुरेशी, रियाज भाई, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष जर्रार कुरेशी, असलम शेख आणि जिब्बू भाई उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. वसी सर यांचे अभिनंदन करत त्यांच्या नव्या उपक्रमासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

कार्यक्रमादरम्यान डॉ. वसी सर यांनी उपस्थितांचे आभार मानत समाजाच्या आरोग्यसेवेसाठी प्रामाणिक, गुणवत्तापूर्ण व सेवाभावी दृष्टिकोनातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांनीही हा उपक्रम समाजोपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत डॉ. वसी सर यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!