ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवत

मानवत येथे दोन कोटीच्या रस्ता कामाचे भव्य उदघाटन

(अंधारवड मारुती मंदिराचा बऱ्याच दिवसाचा रस्ता प्रश्न लागला मार्गी)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक १८ जानेवारी) मानवत तालुका नव्हे तर पंचक्रो शीतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या अंधारवड मारुती मंदिर या मारुती मंदिराकडे जाणारा रस्ता बऱ्याच दिवसा पासून कामाच्या प्रतीक्षेत होता.

या रस्ता कामासाठी दोन कोटी रुपये निधी शासनाकडून उपलब्ध करत डॉ. अंकुश लाड यांच्या नेतृत्वात या रस्ता कामाचे उदघाटन १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.

मानवत तालुका व पंचक्रोशीतील नवसाला पावणारा मारुती म्हणून ओळख असलेला अंधारवड मारुती मंदिर या मंदिर परिसरात दररोज शेकडो भाविक भक्तांची ये – जा असते. तसेच हे मंदिर राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या लगत असल्यामुळे या ठिकाणी जाण्याचा रस्ता सुव्यवस्थित असावा अशी मागणी फार दिवसा पासून भक्त मंडळी करत होते.

या मंदिर परिसरात मानवत शहराचे मुख्य अध्यात्मिक केंद्र चालवणारे महामंडलेश्वर मनीषांनंद पुरी महाराज यांचा देखील सहवास असल्याकारणाने या ठिकाणी भाविक भक्त फार मोठ्या प्रमाणात येणे जाणे करत असतात.

या सर्व परिस्थितीमध्ये रस्ता व परिसरात सु शोभीकरण व्हावे ही मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती. त्याच अनुषंगाने मानवत शहराचे युवा नेते डॉ. अकुश लाड यांनी ही मागणी विचारात घेत शासन दरबारी या साठी निधीची मागणी करत सातत्याने त्याचा पाठपुरावा केला सरते शेवटी या कामासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाल्यावर प्रत्यक्षात १८ जानेवारी रोजी या कामाचा भव्य असा शुभारंभ मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकार भक्तमंडळी यांच्या उपस्थिती त करण्यात आला.

या रस्ता कामाचे उदघाटन पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विजयकुमारजी कत्रूवार यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी शहरातील व्यापारी प्रकाशजी पोरवाल, सुरेशजी काबरा, संजय लड्डा, नंदलाल मंत्री, संजय बांगड, कापड अशोशीयनचे दिलीप हिबारे, माजी नगराध्यक्ष प्रा. सखाहरी पाटील, श्यामभाऊ कोळेकर, बाबुराव हळनोर, कृष्णा बाकळे, महेश साखरे,

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, बाजार समिती संचालक जुगलकिशोर काबरा, रंगनाथ वावरे, नामदेव कोक्कर, नरहरी धुमाळ, प्रल्हादराव दहे, शिवाजीराव दहे, सुरेश कडतन, कचरूलाल कुमावत, दत्तप्रसाद बांगड, प्रभाकर कच्छवे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध पांडे, ॲड. गजानन शिंदे,

डॉ. राजकुमार लड्डा, माजी नगरसेवक गणेशजी कुमावत, गिरीश कत्रूवार, बाजीराव हलनोर, मा. नगसेवक दत्ता चौधरी, मोहन लाड, ॲड. किरण बारहाते, राजकुमार खरात, विनोद राहटे, शिवाजीराव पाटील, गणेश उगले, श्रीधर कोकर, बबनराव राऊत, सोपानराव वाघमारे यांच्या सह शेकडो भक्तमंडळी व डॉ. अंकुश लाड मित्र मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!