www.google.comताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळराजकियशहरसामाजिक

आजाद समाज पार्टी (कां.) आयोजित कार्यकारिणी व भीम आर्मी आढावा बैठक संपन्न

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

पुसद (दिनांक 25) समाज पार्टी (कां.) आणि भीम आर्मी यवतमाळ आयोजित कार्यकारिणी तसेच आढावा बैठक दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी विश्राम गृह, पुसद येथे संपन्न झाली.आगामी काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आजाद समाज पार्टी (कां.) युवा मोर्चा यवतमाळ जिल्हाच्या वतीने पुसद मध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार आहे, असे बैठक दरम्यान जाहीर करण्यात आले.बैठकीसाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा, कार्यकारिणीचे आढावे, तसेच समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

अशोक भालेराव, भीम आर्मी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे काम तरुण पिढीने केले पाहिजें आणि संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना सतत सक्रिय राहण्याचे आवाहन केले.राजकुमार भगत, आजाद समाज पार्टी (कां.) युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष राजकुमार भगत यांच्या हस्ते शरद खंदारे,यांची आजाद समाज पार्टी ग्रामीण तालुका अध्यक्ष पदीनिवड करण्यात आली प्रशिक कांबळे, बेलोरा सर्कल अध्यक्षपदी निवड करण्यात आली,विशाल डाके,वैभव सूर्यवंशी राहुल धुळे राज कांबळे, करण खंदारे अंकुश देवकते. धोंडू ढोणे.सुदर्शन कांबळे, परमेश्वर भगत, विशाल खंदारे, , अनिल कांबळे, भगवान खंदारे, वैभव सूर्यवंशी, राहुल धुळे, अजय लोखंडे, अश्विन कांबळे, राज कांबळे, गजानन ढोणे. दिनेश ढोणे. पंढरी आवळे. रामभाऊ ढोणे. शामराव ढोणे, इत्यादी संघटनेचे पदाधिकारीउपस्थित होते.बैठकीत संपूर्ण कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि उत्साह संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीस बळकटी देणारी ठरली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास वानखेडे सर यांनी केले शरद खंदारे यांनी आभार प्रदर्शन केले महत्त्वाची घोषणा:आगामी काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आजाद समाज पार्टी ( कां.) युवा मोर्चा यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने उमेदवार देणार आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!