ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

पुसद तालुक्यातील मांडवा येथील नवनिर्मित लोकसहभागातील वाचनालयात पुस्तकाची वाढ

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद तालुक्यातील मांडवा येथील ग्रामपंचायत व लोकसहभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची दि. २६ जानेवारी रोजी निर्मिती करण्यात आली.

वाचनालायासाठी अनुकुल चव्हाण यांनी ७०१० रुपयाची तर ॲड. आप्पाराव मैंद यांनी २५ पुस्तके, ग्रामपंचायत अधिकारी एस.टी.तडसे यांनी १२, आर्मी पंजाब राठोड यांनी २ स्पर्धा परीक्षेचे पुस्तके भेट दिली. त्यातच नुकतीच भर म्हणून नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा (घा.)जि. वर्धा येथील प्रा. डॉ. उल्हास राठोड यांनी ३३ पुस्तके, प्रा. डॉ. वंदना तागडे यांनी ४ पुस्तके, प्रा. डॉ.महेंद्र गावंडे यांना ७ पुस्तके, तर प्रा. डॉ. अमित याऊल यांनी २६ पुस्तके भेट दिली. स्पर्धा परीक्षेची ७० पुस्तके प्रा. डॉ. उल्हास राठोड यांनी वाचनालयास भेट देऊन तेथील सुव्यवस्था पाहून कार्यकर्त्याचे कौतुक केले. अजून पुस्तके भेट देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रा. डॉ. उल्हास राठोड, मुख्याध्यापक कैलास भरगाडे, शिक्षक नरेश नालमवार, गजेंद्र थोरात, राखी जयस्वाल, भारती शेळके, ग्रामस्थ भिमराव ढोले,रमेश ढोले,दयाशील ढोले, डि. के., विक्रम राठोड, राजु ढोले,अजय ढोले,वैभव ढोले,निलेश ढोले,संदेश ढोले स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तथा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!