माहूर शहरातील टी-पॉईंट पुसद मुख्य रस्त्यावरील छ. संभाजीनगर नावाचे अज्ञात समाजकंटकांनी फलक काढल्या संदर्भात जाहीर निषेध
(✍️बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✍️समाधान कांबळे प्रतिनिधी)

माहूर:- माहूर चे पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे मार्फत माहूर तालुका जिल्हा नांदेड छत्रपती संभाजी महाराज फलक विषयी तक्रारी अर्ज दि. 01/02/2025 रोजी माहूर पोलीस स्टेशन, नगरपंचायत माहूर व तहसील कार्यालय माहूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तालुका तर्फे निवेदन सादर करण्यात आले.

माहूर शहरातील टी-पॉईंट ते पुसद या मुख्य रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक काही अज्ञात समाजकंटकांनी काढून फेकले.अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक काढून फेकणे हे फार निषेधार्थ आहे.

सदरील गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक तिथे लावण्यात यावे व ज्या समाजकंटकांनी छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक काढून फेकले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

दिलेल्या सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन छत्रपती संभाजी महाराज चौक यांचे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
