उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

चहा का पाजत नाहीस म्हणून तरुणावर चाकू हल्ला

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक २६ एप्रिल) शहरातील चहाचे दुकानावर चहा पीत असताना तिथे आलेल्या मित्राने चहा का पाजत नाहीस म्हणून वाद घालून चाकू हल्ला केल्याची घटना दि. 25 एप्रील रोजी दुपारी 4 :30 वाजता शहरातील हदगाव रोडवरील आमदार गुळाचा चहा कॅन्टीनवर घडली आहे.

संतोष उर्फ आलोक दत्ता राऊत रा. भगतसिंग वार्ड वय 22 वर्षे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उर्फ आलोक हा दुपारी साडेचार वाजताचे सुमारास चहा कॅन्टीन वर चहा पीत असताना तेथे आरोपी नामे तुषार संतोष कळसे वय 22 वर्षे राहणार लोहार गल्ली उमरखेड हा तेथे आलाव तू मला चहा का पाजत नाहीस म्हणून वाद निर्माण केला व त्याच्या हातातील चाकूने पोटाचे डाव्या बाजूच्या वर वार करून गंभीररित्या जखमी केले व जीवाने मारून टाकण्याची धमकी दिली.

अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!