अपघातताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

महागाव (सोईट) शेत शिवारात बिबट्याने केले गाय व वासरूची शिकार

✍️ बबलू भालेराव मुख्य संपादक ✍️ सिध्दार्थ दिवेकर सह संपादक

✍🏻करण भरणे सर (ढाणकी/बिटरगाव विशेष प्रतिनिधी) मो.9421847351

उमरखेड (दिनांक 26 जून) तालुक्यातील महागाव (साईट) बिबट्याने गाय आणि वासरू याची शिकार केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील महागाव (सोईट) येथील शेतात 25 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. महागाव (सोईट) येथील संजय जळबा वाठोरे यांच्या शेतशिवारात 24 जूनला ते दररोज प्रमाणे आपल्या शेतात दुसऱ्या गोठ्यात रात्री बारा वाजेपर्यंत थांबून घरी आले होते.

नंतर सकाळी शेतात गेले असता त्यांना आपली गाय आणि वासरूची हिस्त्र प्राण्याने शिकार करून ठार केल्याचे दिसले.त्यांनी वनविभागाला फोन लावले असता वनविभाग अधिकारी घटना स्थळावर येऊन पंचनामा केल्यावर त्यांनी सांगितले की गाय आणि वासराची शिकार बिबटयाने केली आहे.

त्यानंतर संजय जळबा वाठोरे यांनी वनविभागाकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले आहे. या घटनेमुळे येथील शेतकरी दहशतीचत असून या परिसरातील कृष्णापूर व महागाव (सोईट) भागात अनेकवेळा बिबट्या ने गाय, बैल व शेळ्यांचा शिकार केला आहे.

या घटना वारंवार घडत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!