ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

पोफळी पोलीस स्टेशन समोरच अवैध वळली मटका थाटात सुरु

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

पोफळी:- (दिनांक २६ फेब्रुवारी) पोलीस स्टेशन च्या समोरच अगदी हाकेच्या अंतरावर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध वरळी मटका खुलेआम अगदी थाटात सुरु केला आहे.

गोर -गरिबांचे संसार उद्धवस्त करणाऱ्या वरळी मटक्याच्या नादी लागून पोफळी साखर कारखान्यातील उस तोड कामगार देशोधडीला तर लागलेच शिवाय उस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असल्याचे भयावह चित्र दिसत येत आहे.

सदरील मटका किंगवर पोलिसांचा धाक/जरब अजिबात दिसत नसून उद्धटपणे बिनदिक्कत मटका चालवीत जात आहेत.

सदरील मटका बहाद्दरांवर पोलीस अधीक्षकांनीच अंकुश लावावा असा सूर पोफळीतील जनतेचा निघत आहे.

उमरखेड शहरात आपल्या सेवेत 🎂🎂 केक टाऊन शॉप सुरू करण्यात आलेला आहे. 🎉🎉 एक वेळ अवश्य भेट द्या.!! गणराज कॉम्प्लेक्स GF:06 SBI बँके जवळ पुसद रोड उमरखेड!

पोफळी पोलिसांना न जुमानणाऱ्या या मटकावाल्याचा बंदोबस्त पोलीस अधीक्षकांनी करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!