वसमतमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न; ३० दात्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

वसमत- विश्वाला शांती आणि मानवतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीचे औचित्य साधून वसमत येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘दान’ हे धम्मातील सर्वश्रेष्ठ मूल्य मानले जाते, याच प्रेरणेतून ३ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आसेगाव कॉर्नर येथे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

संयुक्त विद्यमाने आयोजनहे शिबिर शांतिदूत जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान, समस्त भीम जयंती उत्सव समिती (शहर व ग्रामीण) आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय रक्तदान पेढी (नांदेड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

मानवी कल्याणाचा मार्ग स्वीकारत, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एकूण ३० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.मान्यवरांची उपस्थितीयाप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांची विशेष उपस्थिती लाभली होती. शिबिरादरम्यान डॉ. पडोळे, नगरसेवक राजकुमार एंगडे आणि संतोष नांगरे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी संयोजक राजकुमार एंगडे, यशवंतराव उबारे, मास्टर संतोष नांगरे, विजयकुमार एंगडे, ॲड. सत्यपाल सूर्यतळ, भीमराव सूर्यतळ , अनिल पंडित आणि संजय नांगरे यांनी पुढाकार घेतला. नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे डॉ. आरती पडोळे, गिरीष पुराणिक, स्वाती उडतेवार, चक्रवती चौदंते, समाज सेवा अधिक्षक सुमित आवटे व तृप्ती भगत या वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाचे काम पाहिले.तसेच पवन लाटे, अभय नांगरे, डॉ. डी. एस. तारू, भीमराव सरकटे, देवानंद सोनाळे, संविधान पंडित, उत्कर्ष सरतापे आणि निर्भय नांगरे ‘ मिलिंद आळणे बार्टी या स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आयोजित या विधायक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



