दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या व सरकारच्या विरोधात निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एकदिवसीय धरणे आंदोलन
सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उमरखेड – येथे दिल्ली येथील जंतर-मंतरवर जे गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांच्या आंदोलन सुरु आहे. देशातील शिक्षण व्यवस्था कोडमंडली असुन शिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचार दूर करून नीट पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याचा तीव्र असंतोष युवा वर्गामध्ये उतरलेला असुन त्याचा निषेध संपूर्ण देशभर होत असताना 20 जुलै च्या शांतीपूर्ण दिल्ली येथील आंदोलकावर पोलिसांनी सरकारच्या आदेशाने जो अमानुष लाठी चार्ज केला आणि अनेक महिलांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली व अनेक विद्यार्थ्यांचे डोके फोडले कुणाचे पाय मोडले कुणाचे हात मोडले एवढा मोठा अन्याय सरकार या देशातील विद्यार्थ्यावर करत आहे.

त्याच्याच निषेध म्हणून उमरखेड येथे सर्व पुरोगामी विचाराच्या सामाजिक संघटना व पक्ष मिळुन निषेधार्थ धरणे आंदोलन केले आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, भिम टायगर सेना पुरोगामी युवा ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड,प्रहार, बिरसा क्रांती दल, समता सैनिक दल या सर्व संघटनेच्या पदाधिकारी यानी एक दिवसीय धरणे आंदोलन करून जाहीर निषेध केला.

यावेळी सुनिल पाटील चिंचोलकर,जॉन्टिभाऊ विनकरे, शामभाऊ धुळे,सिद्धार्थ दिवेकर, वसंतराव देशमुख, शाहरुख पठाण,प्रवीण इंगळे,शुद्धोधन दिवेकर, देवानंद पाईकराव, प्रफुल दिवेकर कैलास कदम, रवी पडणे,संतोष ठमके,गौतम नवसागरे,संदीप राऊत,भीमराव खंदारे, मनोज धुळध्वज,अंबादास गव्हाळे, ददु धुळे,अर्जुन बरडे,सचिन वाहुळे,राजेसाहेब पंडित. किरण दवणे,सुनील लोखंडे .अन्नपूर्णा बनसोडे,अविनाश सोनुले, स्वरांजली वाघमारे, संजय वाघमारे अश्वजीत मानकर,पप्पू जोगदंडे, अँड शंकर मुनेश्वर. नागेश पाटील . यशवंत काळबांडे दिगंबर श्रवले राहुल सावते. रोहीत धूळे . तुषार धूळे राजु आगिरे गजानन भोयर प्रकाश पंडित व तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



