ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

रिदम कराओके क्लब कवाने सायन्स अकॅडमी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – रिदम म्युझिक अकॅडमी उमरखेड तर्फे रिदम कराओके क्लब कवाने सायन्स अकॅडमी महागाव रोड उमरखेड येथे काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये कराओके क्लबच्या सर्व सदस्यांनी एक एक देशभक्तीपर गीत गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

रिदम अकॅडमीचे संचालक संजय मुटकुळे दरवर्षी देशभक्ती गीतांचा कार्यक्रम घेत असतात. त्यानिमित्ताने शहरातील साहित्यिक तसेच भजन गायक अभी अशोक पंडित यांनी लेखन केलेले माझे विचार हे पुस्तक सर्व गायकांना सप्रेम भेट म्हणून दिले या कार्यक्रमाला शहरातील बरेच गायक मंडळी व रसिक मंडळी यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा गाणे गाऊन आनंद घेतला.

त्यामध्ये डॉ. त्र्यंबक माने साहेब , कवाने अकॅडमी चे संचालक अमोल गव्हाणे, नवनिर्वाचित वकील संघाचे अध्यक्ष तथा उद्योगी. श्री एड. मनीष भट्टड., पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, चित्रपट निर्माते आनंद बाबा शिंदे, सुरेश वाघ, सुरेश राठोड, नंदनवार साहेब,अशोक पंडित असत खान, चक्रधर पटाले, दीपक ढोक , संजय गंगात्री, राजू सावतकर, स्वप्निल वाघ, चंद्रवंशी सर , खूपसे सर ,सिद्धार्थ मुनेश्वर, ठसन्स मामा श्री दीपक शहाणे, के सन्स टेलर, बिरसा मुंडा संघ अध्यक्ष सौ शारदाताई वानोळे, व रिदम अकॅडमी चे संचालक संजय मुटकुळे व सौ शितल मुटकुळे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!