ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

बांधकाम सभापति पदी मसरत फातेमा रफीक सौदागर यांची निवड

तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे.

तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे

माहूर नगरपंचायत मधे विशेष समिती सभापती निवड बिनविरोध झाली. आमच्या नेत्या आदरणीय बेबी ताई नाईक यांच्या मार्गदर्शनखाली सभापतीची निवड करण्यात आली.

बांधकाम सभापति मसरत फातेमा रफीक सौदागर महिला व बाल कल्याण सभापती पदी नंदा काकू रमेश कांबळे पाणी पुरवठा सभापतीपदी शिलाताई रणधीर पाटील आरोग्य सभापतीपदी विजय भाऊ कामाटकर नियोजन सभापतीपदी नाना भाऊ लाड स्थायी सभापती पदी फिरोझ हाजी कादर दोसांनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सर्व सन्मानीय नगरसेवक नगरसेविका यांचे मनपूर्वक आभार व निवड झालेल्या सभापती यांचे अभिनंदन करण्यात आले.

निवडणणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी मेघना मैडम होते. तर मुख्याधिकारी कांदे साहेब, स्वामी साहेब व कर्मचारी उपस्तित होते. निवड पूर्ण झाल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेत्या आदरणीय बेबीताई नाईक यांनी नवनिर्वाचित सभापती चा सत्कार सन्मान केला.

यावेळी तालुका अध्यक्ष मेघराज काका, बंडु मामा नाईक, ऍड राहुल नाईक, सभापती मोहिते काका उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!