ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभिकरण त्वरित सुरू करा!

कोणत्याही बातम्या व जाहिरात साठी महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल शी संपर्क साधावा…! मो.9922870518 / 9823995466

🚨 [पुतळा समितीचे न. प. अध्यक्षा मोहिनी ताई नाईक यांना निवेदन!]

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

पुसद – नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती पुसद च्या वतीने आज नगरपालिकेच्या अध्यक्ष मोहिनीताई नाईक, बांधकाम सभापती अभिजीत पानपट्टी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री राऊत यांच्यासोबत महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण त्वरित सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सुशोभीकरणाला सुरुवात न झाल्यास पुतळा समितीच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. गेल्या वर्षभरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण प्रलंबित आहे. पुतळा समितीच्या वतीने याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुराती घेण्यात आलेल्या आहेत.

पुसद नगरपालिकेचे माजी प्रशासक वायकोस यांच्या कार्यकाळात सुशोभीकरणास लगेच सुरुवात होणार होती, त्याबाबत पुतळा समितीची त्यांची बैठकसुद्धा संपन्न झाली होती त्यांना दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी समितीचे निवेदनही देण्यात आले होते तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माथूरकर साहेब यांनासुद्धा दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी निवेदन देण्यात आले .सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या.परंतु संबंधितांची बदली झाल्याने व लगेच निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सदर काम लांबणीवर गेले.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक यांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता निधी उपलब्ध करून दिलेला आहे व सर्व औपचारिक प्रशासकीय, तांत्रिक बाबी सुद्धा पूर्ण करण्यात आल्या आहेत. तेव्हा नगरपालिकेने तात्काळ सदर काम प्रथम प्राधान्याने पूर्ण करावे असे आजच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव कांबळे,महेश खडसे, शितल कुमार वानखडे, किशोर कांबळे, बुद्धरत्न भालेराव, महेंद्र कांबळे, राजेश ढोले, मिलिंद हट्टेकर, साहेबराव गुजर, सुनील शिरसाट, आधी पुतळा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!