www.google.comउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियसामाजिक

ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटातून सौ. प्रणिताताई कांबळे ह्या निवडणूक लढविणार..!

💥सौ. प्रणिताताई कांबळे ह्या ब्राह्मणगाव गटातून निवडून आल्या तर या गटातील गावांचा विकास निश्चित होईल – सुज्ञान मतदार नागरिक.

✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड – तालुक्यातील ब्राह्मणगाव जिल्हा परिषद हा गट अनुसूचित जाती (एसी) राखीव खुला वर्ग सुटल्यामुळे महिलेला देण्यात येण्याची चर्चा सुरू आहे. ज्या ब्राह्मणगाव जि.प. गटामध्ये पर्जना, चातारी हरदडा, महागाव,सिंदगी,बोरी, माणकेश्वर, कृष्णापुर, कोपरा,धानोरा इत्यादी गावी या गटामध्ये येतात. उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्या, दानशूर सौ.प्रणिताताई कांबळे यांनी अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात तसेच यांच्याकडे नागरिकांनी घेऊन आलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

संपूर्ण तालुक्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून जनतेच्या मनात स्वतःचे घर निर्माण केले. प्रणिताताई कांबळे ह्या सुशिक्षित, अभ्यासू गरिबीची जाणीव असलेल्या आहेत. जनतेच्या कल्याणासाठी ह्या ब्राह्मणगाव जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत लागले आहे. त्यांना अनेक गावातून फोन द्वारे शुभेच्छा देऊन या निवडणुकीत आपण उभे राहावे असा हा आग्रह त्यांना गटामध्ये येणाऱ्या गावातील मतदार बंधू भगिनींनी केला आहे. निश्चितच नागरिकांच्या जनभावना लक्षात घेऊन सौ. प्रणिताताई कांबळे या निवडणुकीमध्ये उभे राहण्याची भक्कम तयारी करीत आहेत.

मूळच्या ह्या हरदडा येथील रहिवासी असो त्यांच्या पाठीमागे संपूर्ण गाव एकवटलेली आहे. अशा हुशार व्यक्तिमत्वाला या निवडणुकीमध्ये संधी मिळाली तर ब्राह्मणगाव गटातील गावांचा विकास हा निश्चित होईल अशी अनेक सुज्ञान नागरिकांनी सुचक माहिती आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या सहसंपादकास चर्चा करतांना माहिती दिली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!