ताज्या बातम्यापरभणीमानवतसामाजिक

धारासुर येथे त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्सहात साजरी

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक) ✍🏻 प्रविण घागरे (परभणी / प्रतिनिधी) मो. 8308755238

गंगाखेड तालुक्यातील मौ. धारासूर येथे ०७ फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून श्री. लक्ष्मणराव नामदेवराव कदम हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. अंगद भारतराव जाधव हे होते यावेळी पंचशील ध्वजाचे धम्म ध्वजारोहण श्री.शेषराव चिंतामणराव कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक धारासूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री. राजेभाऊ गवळे यांनी केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. सुरेश (आण्णा) जाधव श्री. परमेश्वर उद्धवराव कदम, अतुल जाधव, नारायण शिंदे, संभाजी ढेंबरे, बळीराम दुगाने, हनुमान कदम, अशोक शिंदे, आदींची यावेळी उपस्थिती होती.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद जंगले, उत्तम गवळे, राहुल मस्के, नितीन शेळके, महेंद्र गवळे, सुदोधन गवळे, दामोदर गवळे, सुरज गवळे, विशाल शेळके, नारायण गवळे, शैलेश जंगले, सुमेध मस्के, अनिकेत गवळे यांच्या सह समाज बांधव व जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व महिला मंडळानी परिश्रम घेतले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!