वंचित चा तात्या विंचू फरार…! वायरल झालेला बॉण्ड फोटो खोटा की खरा..?
उमरखेड


✒️बबलु भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518
✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 19 नोव्हेंबर) उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभा निवडणुकी च्या प्रचाराला ब्रेक लागला असून एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये तातेराव हनवते यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.

व बऱ्याच दिवसापासून त्यांच्या प्रचाराला सुरुवातही झालेली होती आणि अनेक प्रामाणिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रचारही खूप मनापासून करत होते.पण मतदानाच्या एक दिवस अगोदर एक सोशल मीडियावर तातेराव हनवते यांच्या सहिनिशी बॉण्ड चा फोटो व्हायरल झाला असून त्यामध्ये तातेराव हनवते यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांची फोन द्वारे परवानगी घेतली असे नमूद केलेले आहे

काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे असे लेखी स्वरूपाचे आहे.हा बॉण्ड वायरल होताच वंचित चे अधिकृत उमेदवार तातेराव हनवते हे कोणालाही न सांगता अचानक नांदेड येथे रवाना झाले आहे. पक्षातील दामोदर यांनी फोन कॉल करून माहिती विचारल्यास हनवते म्हणाले की, मी नांदेड येथे तब्येत ठीक नसल्यामुळे दवाखान्यात आलो आहे

दामोदर हे म्हणाले की, वंचित चा उमेदवाराने कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही ते अजून निवडणुकीत उभे आहेत कुठलाही विड्रॉल किंवा माघार घेतलेली नाही. असे बोलून पाठराखण केली आहे.अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये डी के दामोदर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. प्रसारमाध्यमाच्या व्हाट्सअप ग्रुप फेसबुकवर तातेराव हनवते यांनी पाठिंबा दिलेला बॉण्डचा फोटो व्हायरल झाल्यामुळे वंचितचा तात्या विंचू फरार झाला आहे अशी चर्चा मतदार बंधूंमध्ये सुरू झाली आहे. सदर बॉण्ड हा सत्य आहे की असत्य आहे याचा उलनगडा किंवा शहानिशा आज पर्यंत झालेला नाही.
