उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड बौध्द विहाराच्या मागील लोमबलेले कंजूमर कंडक्टर वर करून देणे – मुख्याधिकारी (नप)

🚨(संदर्भ : मा. नगराध्यक्षा यांचे मौखिक आदेशान्वे.)

✍🏻बबलू भालेराव (मुख्य संपादक)

उमरखेड – शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील तसेच सम्यक बुद्ध विहार परिसरातील एक लाईट वारंवार जात आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सिध्दार्थ दिवेकर यांनी संबंधित नगरपरिषद कर्मचारी व कर्मचारी आणि नगरसेवकांना वारंवार सांगितले होते. कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. नविलाजाने महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलला बातमी लावून प्रसिद्ध करावी लागली होती. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि अध्यक्षा तात्काळ दखल घेऊन महावितरण वीज पुरवठा कंपनी शाखा उमरखेड यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की,

उपरोक्त संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड बौध्द विहाराच्या मागील लोमबलेले कंजूमर कंडक्टर पूर्णपणे जीर्ण झाले असून दोन तारांमधील अंतर खूपच कमी असल्यामुळे रात्रीच्या वेळेस उच्च दाब वाढलाकी एकमेकांच्या स्पर्शामुळे स्पार्किंग होऊन संपूर्ण वार्डाची लाईनतर जाते सोबत स्ट्रीट, लाईटचे जंपर जळून स्ट्रीट लाईट बंद पडतात हे वारंवार होत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस परिसरात पूर्णपणे अंधार पसरतो तसेच त्या ठिकाणी अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांची वारंवार तक्रार येत असून नागरीकांन मध्ये रोष निर्माण होत आहे. आपल्या स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील LT पोल वाकले असल्यामुळे लोमबलेले कंजूमर कंडक्टर ओढून घेण्यात यावे तरी लवकरात लवकर उपाययोजना करून उचीत कार्यवाही करावी ही विनंती. असे लेखी पत्र नप मुख्याधिकारी यांनी दिले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!