अपराधउमरखेडक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

उमरखेड पोलिसांची मोठी कारवाई; तडीपार आरोपी गावठी कट्ट्यासह अटक

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उमरखेड – पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार असलेला आरोपी अरिशोद्दीन मोहम्मद तारेकोद्दीन खतीब (वय २४ वर्ष) हा हैद्राबाद येथून उमरखेड येथे आला असून, तो स्वतःजवळ बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगून असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे उमरखेड पोलिसांच्या डीबी (DB) पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीच्या झडतीमध्ये त्याच्याकडून ३०,०००/- रुपये किमतीचा १ देशी कट्टा (गावठी कट्टा) आणि १ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्गदर्शन व कारवाई पथक:- ही कामगिरी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि उमरखेडचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

कारवाईमध्ये सपोनि व्यंकट गंगलवाड, पोउपनि शरद लोहकरे, हवालदार चंदन जाधव, पोलीस अंमलदार दिगांबर गीते आणि संघशील टेंबरे यांच्या डीबी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!