www.google.comउमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

बाळदी येथे गौतम बुद्ध मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना

(तक्षशिला बौद्ध विहारात त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना, धम्मदेशनासह खीरदानाचा कार्यक्रम)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – बाळदी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून बाळदी येथील तक्षशिला बौद्ध विहारात तथागत महामानव गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. विहार समिती तसेच उपासक-उपासिकांच्या वतीने या मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण व पंचशील ग्रहणाने करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना व धम्मदेशनाचा कार्यक्रम पार पडला. उपस्थित उपासक-उपासिकांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या मानवतावादी धम्ममार्गाचा स्वीकार करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाच्या शेवटी खीरदान करण्यात आले.गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेमुळे तक्षशिला बौद्ध विहाराच्या आध्यात्मिक वातावरणात तसेच सौंदर्यात भर पडली आहे. मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास गावातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः गावातील तरुणांमध्ये बौद्ध धम्म आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांविषयी नव्या प्रेरणेची व जागृतीची भावना निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासह धम्मविचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तक्षशिला बौद्ध विहार समिती, बाळदी यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले. शांततामय व मंगलमय वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button