नरळद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाची कार्यकारिणी जाहीर

🔵 अध्यक्षपदी अमोल (भैया) तुपसमुंद्रे, तर उपाध्यक्षपदी अविनाश तुपसमुंद्रे 🔵
✍️प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)

मानवत (दिनांक ०३ एप्रिल) तालुक्यातील मौ. नरळद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीची निवड नुकतीच ०१ रोजी जाहीर करण्यात आली.

दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती तालुक्यातील मौ. नरळद येथे दिनांक २२ एप्रिल रोजी मोठया उत्सहात साजरी केली जाणार आहे याच अनुषंगाने जयंती उत्सव समिती ची निवड करण्यात आली.

जयंती उत्सव समितीचा अध्यक्षपदी अमोल (भैया) तूपसमुंद्रे तर उपाध्यक्षपदी अविनाश तूपसमुंद्रे, सहसचिव संतोष तूपसमुंद्रे, सचिव विश्वजीत तूपसमुंद्रे, कोषाध्यक्ष निशांत तूपसमुंद्रे, मार्ग दर्शक म्हणून जयवंत तूपसमुंद्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी बैठकीस तथागत युवा मंचचे पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. जयंती उत्सव समिती पदी निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
