शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थीना प्रशिक्षण

(आँन जाँब ट्रेनिंग अंतर्गत प्रशिक्षण)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
यवतमाळ – औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय. टी. आय यवतमाळ येथील प्रथम वर्षातील विजतंत्री इलेक्ट्रशियनच्या एकूण १९ विद्यार्थीना ऑन जाँब ट्रेनिंग अंतर्गत 150 तास इलेक्ट्रिशयचे ट्रेनिंग तुमसरे इलेक्ट्रिकल वडगांव रोड यांनी दिले. तसेच द्वितीय वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आँन जाँब ट्रेनिंग अंतर्गत एकुण 35(पसत्तीस) विद्यार्थ्यांना दि. 09/03/2026 ते 07/04/2026 पर्यंत 150 तास प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहण्याची संधी यामुळे मिळणार आहे.

सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य राहणारे तुमसरे इलेक्ट्रिकलचे,व संकल्प फाउंडेशनचे शहर प्रसिद्धी प्रमुख सागर महादेवराव तुमसरे या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग योग्य प्रकारे व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य श्री.व्ही. जे.नागोरे सर व शिल्पनिदेशक श्री. सौरभ देऊळकर, श्री. जी. पी. ठोबंरे , व कु.ए. बी. मुन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू असून प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार आहे.

तुमसरे इलेक्ट्रिकल च्या पाठपुराव्यामुळे हे प्रशिक्षण देणे शक्य होत आहे,अशी प्रतिक्रिया तुमसरे इलेक्ट्रिकचे सागर महादेवराव तुमसरे यांनी दिली यावेळी विशाल अतकरी, पंडीत बाबळे, शांतुनु धोटे इत्यादी उपस्थित होते आणि प्रशिक्षणासाठी आलेले एकुण पसत्तीस विद्यार्थी यावेळी प्रशिक्षण घेत होते.
