ताज्या बातम्यामानवतराजकियविशेषशहर

मानवत शहर आध्यात्मिक क्षेत्र म्हणून विकसित करणार – आमदार राजेश विटेकर

[महापारायण सोहळ्यात पंधरा हजार भाविकांनी केले सामूहिक पारायण]

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०५ जानेवारी)मानवत शहरात सातत्याने भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे शहर व परिसर आध्या त्मिक क्षेत्र म्हणून विकसित करणार असल्याचे प्रतिपादन पाथरी विधान सभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी केले.

मानवत येथील श्री गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने रविवार ०५ जानेवारी रोजी आयोजित श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायण संपन्न झाले. राज्य भरातून आलेल्या पंधरा हजार भाविकांनी सामूहिक पारायण केले.

पारायणाचे नेतृत्व संध्याताई देशपांडे यांनी केले. यावेळी महामंडलेश्वर १००८ स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज, स्वामी महेशानंद महाराज, ह. भ. प. रामराव महाराज हेंडगे, ह. भ. प. पंडित महाराज डाके, डॉ. अंकुश लाड, मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंकज आंबेगावकर, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल नखाते, भावनाताई नखाते यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. अंकुश लाड यांनी सांगितले की, मानवत शहरातील आजवर झालेल्या धार्मिक कार्यक्रमात अतिशय भव्य दिव्य पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

अशा कार्यक्रमाना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे यावेळी ते म्हणाले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!