ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक

बाळदी येथील शाळेची दयनीय अवस्था ; प्रशासनाकडून तात्काळ लक्ष घालण्याची गरज

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक – मो.9823995466

उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात तांड्यावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची गंभीर समस्या आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागते.गेल्या कित्येक महिन्यापासून छतावरून खाली पाणी येत आहे.

तरी शिक्षण विभागाचे याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे. स्थानिक प्रशासनाचे सुद्धा लक्ष नाही. यासंदर्भात दिनांक 5/07/ 2025 रोजीमुख्याध्यापकांमार्फत ग्रामपंचायत बाळदी यांना लेखी अर्ज करण्यात आला होता.

त्यामध्ये शाळेचे छत दोन वर्ग खोल्या,कार्यालय व व्हरांडा पावसाळ्यात गळतो,छोटी छोटी छताचे तुकडे पडते तसेच शाळेच्या खिडक्या आणि महत्त्वाचे किचनचे दार इत्यादी अडचणी त्यामध्ये मांडले होत्या.परंतु अध्याप त्याची दखल कोणीही घेतली नाही शेवटी थेट तेथील शिक्षकांनी स्व:खर्चातून किचनचे दार बसवले.

त्याआधी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ग्रामपंचायत यांना शाळा व्यवस्थापन समितीकडून वारंवार कळवले असता किचनचे दार आज करू उद्या करू असे उडवा उडवी चे उत्तरे ग्रामपंचायतकडून देण्यात आली. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संडास बाथरूम पण नाही ज्या आहेत त्या बंद अवस्थेमध्ये आहेत,शाळेच्या बाजूचा तुटक रस्ता नेहमी चिखलमय असतो.

अशा अनेक समस्यामुळे तेथील सर्वसामान्य व गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळेचे गेट पण तुटलेल्या अवस्थेत आहे. ते गेट बंद पण करता येत नाही.झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल का? याकडे लक्ष कोण देणार अशी मागणी येथील पालक वर्गांकडून होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!