उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

पो फा ळी जि.प. शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न! सप्त रंगा त रंगले चिमुकले..!

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – दैनंदिन अभ्यासाबरोबरच विद्यार्थीच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या शिक्षकांनी यांनी शाळेत स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या संमेलनात प्रमुख पाहुण्यांना शाळेच्या मुख्यद्वारा पासून विध्यार्थिनींस्वागत करीत मंचकावर आणले.

उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कपिल बरडे हे होते तर उदघाटक प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील माधवराव गुढारे हे होने तर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मंचकावर उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या विविध मराठी व हिंदी गाण्यावर आधारित नृत्य सादर करून उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकांची मने जिंकली.

चिमुकल्यांसाठी पालकांनीही खिसा रिकामा करत हजारो रुपये खाऊसाठी बक्षीस दिले.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षक नगरे मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातापालकांचे विशेष सहकार्य लाभले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!