Uncategorized

मानवत येथील मानोली नाका येथे विनंती बस थांबा पाटीचे आगार प्रमुखाचे यांच्या हस्ते उद्घाटन

***मानवत येथील मानोली नाका येथे विनंती बस थांबा पाटीचे आगार प्रमुखाचे यांच्या हस्ते उद्घाटन*______________________________________मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे. मानवत शहरातील रिंगरोड वर असलेल्या मानोली नाका येथे विनंती बस थांबा मंजुर करण्यात आला असुन त्याचा दर्शनी पाटीचे उद्घाटन पाथरी बस आगारप्रमुख श्री गजानन येडले यांच्या हस्ते करण्यात आले दि.19 मे रोजी सदर बस थांब्याच्या पाटीचे उद्घाटन करण्यात आले. मानोली नाका (कोक्कर कॉलनी जवळील ) या ठिकाणा पासुन बस स्थानकाचे अंतर जवळपास दोन ते अडिच किलोमिटर असुन प्रवाशांना पाथरी परभणी जाण्यासाठी खूप धावपळ करून आर्थिक नुकसान सहन करावे लागते ऐनवेळी बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी ॲटो सारखे वाहन मिळत नाही म्हणून या ठिकाणी विनंती थांबा करण्यात यावा अशी मागणी या भागातील लोकांनी पाथरी आगार प्रमुख व विभागीय कार्यालया परभणी यांचेकडे करण्यात आली होती. त्यावरून बस विभागा च्या दोन्ही कार्याच्याकडून सदर ठिकाणी विनंती बस थांबा करणे संदर्भात पाहणी करून अखेर या ठिकाणी बस थांबा मंजूर करण्यात आला. पाथरी येथील बस आगार प्रमुख श्री. गजानन येडले व श्री. अशोक चिलवंत यांचे हस्ते विनंती बस थांबा पाटीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री. नागनाथ कदम , श्री. गुलाबराव लांडगे , रामेश्वर काष्टे , बळीराम वाघमारे , नारायण रासवे , नवनाथ करपे, अशोक चिकणे , वैजनाथ खरात , गणेश राऊत , अविनाश देशमाने , गणेश धुमाळ, कृष्णा नलावडे , रवि हजारे , कृष्णा पारवे , दिपक होंडे , सुरेश क्षिरसागर, निखिल कदम , मारोती रोडे , अभिषेक आळसे ,दिपक धायरे इत्यादी उपस्थित होते , सर्वांनी महाराष्ट्र परिवहन महा मंडळाच्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले.***

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!