अपघातउमरखेडताज्या बातम्यायवतमाळ

बस पलटी होऊन 14 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू

(कॉन्व्हेंट मधील 3 ते 4 वर्षाचे विद्यार्थी बसमध्ये होते)

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक)

उमरखेड (दिनांक 25 जानेवारी) तालुक्यातील पळशी फाटा ते अंबाळी फाटा दरम्यान देशमुख यांच्या शेतालगत दहागाव वेलफेर इंग्लिश स्कूल शाळेच्या बस क्रमांक MH 29M 8488 ही आज सकाळी लिंबाच्या झाडाला जबर धडक दिल्याने कुमारी महिमा आप्पाराव सरकाटे ह्या १४ वर्षीय मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

महिमा ही दिवटपिंप्री या गावांमध्ये राहत होती. शाळेकरीता रोज बसने ये-जा करत होती पण आज काळाने तिच्यावर घात घालून एकुलत्या एक मुलीला आई-वडिलांपासून दूर केले आहे.

सदर घटना ही ह्रदय पिळवून टाकणारी आहे.महिमा वर्ग आठवी मध्ये शिकत होती.या घटनेमुळे उमरखेड तालुका सह पिंपरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बस मध्ये कॉन्व्हेंट मधील तीन ते चार वर्षाचे विद्यार्थी बसले होते.बसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ ईजा झाली तर काही विद्यार्थी सुखरूप आहेत अशी माहिती मिळाली आहे.

पुढील तपास पोफाळी स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे हे करीत आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!