उमरखेडदेश-विदेशमहाराष्ट्रसामाजिक

दुबई येथे डॉ.अनिल काळबांडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518

✍️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक 13 नोव्हेंबर) येथील प्रख्यात विचारवंत , साहित्यिक तथा मिलिंद महाविद्यालय मुळावा चे मराठी विभाग प्रा.डॉ.अनिल काळबांडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. दुबई येथील महात्मा ज्योतिराव फुले विचार पिठावर आयोजित चौथे विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलन जागतीक आंबेडकरी महामंडळाच्या वतीने आयोजित केले होते.

या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे (नाशिक समीक्षक माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (पुणे ) प्रख्यात विचारवंत डॉ. जगन वंजारे (सांगली ) प्रख्यात हिंदी साहित्यिक के पी सिंग दिल्ली ) डॉ कृपाशंकर वासनिक (दिल्ली) डॉ. एम.के मकवाना (गुजरात) संमेलनाचे आयोजक प्रा दीपककुमार खोब्रागडे, डॉ.अंजली ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. काळबांडे यांना स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या 30 वर्षापासून मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे मराठीचे अध्यापन करत असताना फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये दिलेले अमूल्य योगदान, त्यांची साहित्य सेवा पाहता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे डॉ काळबांडे यांना याही अगोदर अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ.काळबांडे यांनी , जवळपास 12 ग्रंथाचे लिखाण केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी चे आतापर्यंत 50 च्या वर शोध निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांना जवळपास 200 पुरस्कारांनी आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे. जवळपास 13 देशाचा प्रवास त्यांनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलेला आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेहना बेग यांनी केले तर आभार अँड रुपेश पाटील यांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!