बिटरगाव पोलीस स्टेशन परिसरातील अवैध धंदे जुगार, मटका, दारु, गुटखा, रेती, अवैध मुरुम उत्खनन त्वरीत कायमस्वरुपी बंद करा – भीम टायगर सेना

(जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार निवेदन सादर)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 11 ऑक्टोंबर) तालुक्यातील ढाणकी बिटरगाव परिसरामध्ये अवैध धंदे जुगार, मटका, गुटखा, रेती, अवैध मुरुम उत्खनन त्वरीत बंद करण्यात यावे.आताच्या घडीला मेट या गावांमध्ये जुगार अड्ड्याचा आनंदवन तयार झाला आहे.
यामुळे अनेक नागरीकांचे संसार उघड्यावर येत असून शालेय मुले वाईट व्यसनाला लागून आपले जीवन उध्वस्त करीत आहेत.

शहरातील अनेक महिलांनी सुद्धा आमच्याकडे तक्रारी केल्या आहे की आमचे पती दिवसभर काम करून रोज मजुरीचे पैसे सुगार व मटक्यात घालवीत आहेत त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच माझ्या समाजाचे अनेक विद्यार्थी धनकी बिटरगाव येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितले की आपले अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी हे मटका व जुगार जुगारांच्या नादी लागले आहेत त्यामुळे त्यांचे भवितव्य उध्वस्त होत आहे.

तसेच पोलीस शिपाई रवी गीते व त्यांचे खबरीदाराच्या माध्यमातून अवैध जुगार, मटका, अवैध दारू, अवैध रेती, अवैध गुटखा, अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्या लोकांकडुन मोठ्या प्रमाणात वर्दीचा धाक दाखवुन पैश्याची वसुली करीत आहे.म्हणून पोलीस शिपाई रवी गीते यांचे कॉल डिटेक्ल्स चेक करण्यात यावे.

तसेच शिपाई रवी गीते हा मागील दहा ते बारा वर्षापासून एकच पोलीस स्टेशनला ड्युटी का? याबद्दलही चौकशी झाली पाहिजे..! गीते यांची इतरत्व बदली का? करण्यात आली नाही. तसेच उमरखेड तालुक्यातील ढाणकी बिटरगाव पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात जुगाराचे अड्डे, अवैध मटका, अवैध दारू अवैध, वाहतूक, अवैध गुटखा इत्यादी अनेक अवैध धंदे सुरू झाली आहेत. म्हणून ढाणकी बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तत्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. अशी मागणी भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शाम धुळे यांनी केली आहे.

अन्यथा भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेच्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलन करणाऱ्यांची काही बरे वाईट झाल्यास संबंधित पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
