राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मानवत येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक ०३ जानेवारी) मानवत येथील व्यंकटेश फुटवेअर येथे दि.०३ जानेवारी रोजी विद्येची जननी, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन, म्हणून साजरी करण्यात आली.

यावेळी सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मानवत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे, वंचित बहुजन आघाडीचे मानवत तालुका महा सचिव जालिंदर वाघमारे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उपाध्यक्ष रमेश केंदळे,

भाजपचे भटक्या मुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस शामराव जाधव, अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे मानवत तालुका अध्यक्ष मुक्तीराम जाधव, राजेंद्र कांबळे, व्यंकटेश ठोंबरे यांच्या सह अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
