सिद्धेश्वर वार्ड येथील डीलर शेवंतराव गायकवाड हे निष्कृष्ट दर्जाचे,मानवास खाण्यास लायक नसणारे धान्य वाटप करत असल्यामुळे तात्काळ कारवाई करा – शाम धुळे

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)
उमरखेड (दिनांक १३जून) शहरातील सिद्धेश्वर वार्ड येथील डीलर शेवंतराव. ता. गायकवाड यांच्या रास्त भाव धान्य दुकानातून निष्कृष्ट दर्जाचे मानवास खाण्यास लायक नसणारे, केरकचरा मिश्रित, भेसळयुक्त असणारे धान्य वाटप करीत आहे.

सदर दुकानदार हा निष्कृष्ट धान्य वाटपाबाबत विचारणा केल्यास महिला ग्राहकास उद्धटवर्तन आणि बोलून अपमानित करीत आहेत.

तरी सदर दुकानाची अन्न व पुरवठा विभाग निरीक्षक यांच्यामार्फत चिकित्सक आणि सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करून संबंधिताचे राशन दुकानदार यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करीत आहे.

चौकट :- तात्काळ चौकशी करून कारवाई करणार – उमरखेड तहसीलदार – सुरडकर
चौकट :- निष्कृष्ट दर्जाचा धान्याचा साठा शासकीय बदामात जमा करून नवीन साठा राशन कार्डधारक यांना वाटप करणार – पुरवठा अधिकारी महाजन.

अशी रितसर तक्रार शामभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ यांनी केली.
