उमरखेडदेश-विदेशमहाराष्ट्रराजकियविशेष

ग्रहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध;महाविकास आघाडीचे निदर्शने व आंदोलन

✍️बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड :- (दि.20 डिसेंबर) देशाचे क्रेंदीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते.

या बाबत कॉग्रेससह महाविकास आघाडीने निषेध नोंदवित, स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवारी दुपारी 1 वाजता आंदोलन केले. लोकसभेतील चर्चेदरम्यान देशाचे ग्रहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते.

यावरून संपूर्ण देशात व महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यावरून कॉग्रेससह महाविकास आघाडीने, आज गुरुवारी दुपारी 1 वाजता, स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, तीव्र नारेबाजी करीत आंदोलन केले.

ह्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी कॉग्रेस सह महाविकास आघाडीचे नेते तातू देशमुख, दत्तराव शिंदे, सतीश नाईक, गोपाल अग्रवाल, बाळासाहेब चंद्रे,

अमोल तुपेकर, बाबुराव नरवाडे, प्रेम वानखेडे, बालाजी दुर्गमवार, कल्याणराव राणे, वासिफ पठाण, बाबू हिना, कुणाल श्रवले, वीरेंद्र खंदारे, गजानन देशमुख, सोनू खतीब, ईश्वर गोस्वामी, अक्षय गोस्वामी, संतोष निथळे,

नामदेव मुरमुरे, राहुल काळबांडे, नितीन शिंदे, जुबेर कुरेशी, प्रभाकर गांजरे, मधुकर फटिंग आदीपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!