मानवत येथील स्कॉलर्स प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये रविवारी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238
परभणी (दिनांक 18 जानेवारी) मानवत येथील स्कालर्स फाउंडेशन संचलित स्कालर्स प्रि – प्रायमरी स्कुल च्या वतीने १९ जानेवारी रविवार रोजी बालचिमुकल्याच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी स्कॉलर्स प्रि-प्रायमरी स्कूल मानवतच्या वतीने, बाल चिमुकल्यांना आनंदीत करण्यासाठी व त्यांच्या कला गुणांना वाव मिळन्यासाठी सर्व मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन १९ जानेवारी रविवार रोजी सायंकाळी ५:०० मानवत शहरातील एकता नगर गार्डन समोरच्या प्रांगणात आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. बजरंगसिंह गिल्डा हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून मोरेगाव केंद्राचा केंद्र प्रमुख श्रीमती. मायादेवी गायकवाड, मानवत केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. उमाकांत हाडूळे हे उपस्थिती राहणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून उत्कृष्ट वक्ते तथा पत्रकार श्री. सत्यशिल घबडगे तसेच टी. व्ही. अँड रेडिओ आर्टीस्ट तथा मरतनाट्यम नृत्य कलाकार कु. ऐश्वर्या विनोद डावरे यांची उपस्थिती लाभणार आहे.

या आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अश्विनी पांडे व कु. सायली मोरे या विदयार्थीनी करणार असून या कार्य क्रमास सह कुटुंब जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रि – स्कॉलर्स स्कूलचा मुख्यध्यापक तथा आयोजक सौ. मिनाक्षी गंगाधरराव कंकाळ, सौ. संध्या धनंजय पांडे, सौ. वैष्णवी राहुल कंकाळ, सौ. रेखा सखाराम कदम यांच्या सह आयोज कांनी केले आहे.
